Sunday, 3 January 2021

प्रसंगानुरूप काव्य

 


प्रसंगानुरूप काव्य

जिथे सागरा धरणी मिळते....


बघ धुंदल्या क्षणांना

मंतरल्या वाटेवरी

चांद आला उतरून

सागराच्या या किनारी


सावळ्याशा भूईवरी

दाटली आभाळमाया

चांदण्यांचे पांघरूण

घेई सागराची काया


मर्मबंध जुळलेत

आकाश नि धरेचे

समुद्रकिनारी ऐसे

होई मिलन तयांचे


आनंदुनी लाट धावे

पाहण्या मिलनोत्सव

सामावून घेई सारा

हृदयी हा महोत्सव


रसिका राजीव हिंगे




1 comment:

  1. काव्य म्हणून अपेक्षाभंग न करणारं अलिकडे वाचनात आलेलं छान काव्य

    ReplyDelete