Sunday, 31 January 2021

शुभ सकाळ

 गणतंत्र दिन चिरायू हो





रविराज आले आज

माझा तिरंगा पाहण्या

गवसणी गगनास

कशी घालतो बघण्या


उंच उंच वाऱ्यासवे

फडकतो डौलात हा

उर भरुनी येतसे

नसे दुजा या सम हा


झाले अमर हुतात्मे

दिल्या किती प्राणाहूती

मातेच्या अंकावरती

सहज निजल्या ज्योती


व्यर्थ न हे बलिदान

झाला देश गणतंत्र 

संविधान भारताचे

हे मानवतेचे मंत्र


रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment