Sunday, 31 January 2021

शुभ सकाळ*

 *शुभ सकाळ* 


तिमिरातुनी ये तेजोगोल

घरट्यात पाखरे जागली

पिवळ्या किरणाची आभा

भूवरी शुभ सकाळ झाली


काळोखाचा पटल सारून

प्रकाशाचा मिळे नजराणा

सांभाळते दिवसभर धरा

तेजोमय ह्या रविकिरणांना


श्रद्धा भक्तिभाव आत्मबळ

असे भवसागरी या आधार

आत्मबळाचा प्रकाश दावी

जगण्याचे मार्ग सहस्त्राकार



©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment