कालचक्र
आतंकवाद्यांसवे चालतो निसर्ग ही दाहशतीच्या वाटा
कधी वादळे, कधी भूकंप तर कधी त्सुनामी च्या लाटा
मातृभूच्या नंदनवनी आतंकवाद्यांचीच दहशत
दक्षिणेत झाली सगळ्यांची त्सुनामीमुळे वाताहत
कधी विमानाचे हायजॅक तर कधी कुणाचे अपहरण
मानवच झाला आहे निसर्गाच्या प्रकोपास कारण
कुठे होतो चारा घोटाळा तर कुणावर खुनाचा आळ
कोण सज्जन अन कोण दुर्जन ठरवतोय काळ
जयेन्द्राच्या बदनामीमुळे कासावीस झाले कांचीपुरम
डॉन च्या दहशतीमुळे उध्वस्त झाले मुंबापुरम
कुठे पुराचे थैमान तर कुठे पाण्यासाठी वणवण
उलटे फिरले कालचक्र कोसळले निसर्गाचे संतुलन
रसिका
२७/१२/२००५