*सौभाग्य* ®️
किती भाग्यवंत बाई
घडे अप्रूप खरोखरी
लेक जन्मा आली माझी
आले हो सौभाग्य द्वारी
मिरविते आईपण
आले चालत हो भाग्य
मातृत्वाचे आंदण हे
जन्मांतरीचे सौभाग्य
बाळलीलामध्ये जाई
सारा दिवस निघून
ऐसे सुगंधित बाल्य
जणू ठेवावे जपून
परंपरा संस्कारात
मोठी होत जाती बाळे
हीच समृद्धी नि यश
हेच सौभाग्य सोहळे
कुठे यापरिस सौभाग्य
आहे का सांग न देवा
संस्कारित या बाळांनी
देश महासत्ता व्हावा
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment