Monday, 4 January 2021

चित्रकाव्य

 





असे कोवळी चाहूल

नको निष्ठुर होऊस

भाव मनीचे सारेच

हृदयात जपावेस


आहे कोवळे अंकुर

बीजापोटी फुललेले

ऐसे येताच भूवरी

बघ किती आनंदले


जगावेसे वाटताना

घाला विचित्र दैवाचा

कैसे असते संचित

खेळ सारा नियतीचा


अरे सांभाळ पाऊल

आहे रोप इवलेसे

करी सृजन सृष्टीचे

बीजांकुर हे छोटेसे


आनंदाच्या ओंजळीत

देई  तयासी आधार

बहरेल मोहरेल

सृष्टीचा हा मूलाधार


रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment