Sunday, 31 January 2021

शुभ सकाळ*

 *शुभ सकाळ* 


विठ्ठल विठ्ठल   नामाचा गजर

भक्तीचा सागर   उचंबळे।


जनाबाई घरी   भरीतसे पाणी

प्रेमे चक्रपाणी  भक्तीस्तव।


विठ्ठलाच्या पायी  ठेविता हो डोई

लाभते पुण्याई   जन्मोजन्मी।


युगे अठ्ठावीस    हात कटीवरी

ठेवुनिया हरी    उभा असे।


श्रीहरी श्रीरंग  निर्गुण ते रूप

जाहले सगुण  भक्तांसाठी


कर्मगती मोठी  आहे या जगती

सकला सांगती  विठुमाय।


विठ्ठलच्या रूपे भेटे गुरूराज

सांगितले गुज  प्रपंचाचे।


नको रे मानवा अहंकार ठेवू

श्रीचरणी भावू  असावा रे।


तेणे तुज लाभे  कृपेचा सागर

आयुष्य सुंदर   होईल रे।


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment