ये रविराजा झडकरी अता
बघ रे सृष्टी अधीर झाली
नवपरिणीता जणू भासते
तुज भेटाया सजली नटली
हिरवाईची पैठणी ल्याली
दवबिंदूंचे साज चमचमती
लज्जेची लाली गाली येता
प्रतिबिंब पडे क्षितिजावरती
गोड पसारा सृष्टीचा या
कैसी होई भूल जीवास
वर्म कळेना सत्यत्त्वाचे
श्रीगुरु चरणी ये आश्रयास
जाणून घेता एकच तत्वा
कळे आकळे सारे सारे
मिथ्यत्त्वाचा होई निरास
श्रीगुरु दावी आत्मसुखा रे
रसिका राजीव हिंगे
