Sunday, 31 January 2021

शुभ सकाळ






झाला बघा सूर्योदय

ऊन कोवळे हासरे

माझ्या अंगणात आले

आले नाचत साजरे


आले गवाक्षातूनही

उभे माझिया दारात

घेत विसावा रमले

ऐसे माझ्या अंगणात


ऐसे अंगण साजिरे

माझ्या भारत देशाचे

आला इथे तो रमला

असे मोठे भाग्य त्याचे


जन्म घेती संतजन

अंगणात शुभंकर 

जगन्नाथ विष्णू इथे

घेई दश अवतार


सर्वधर्मसमभाव

इथे सहज नांदतो

मोह माझ्याच देशाचा

परक्यांना ही पडतो


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment