Sunday, 31 January 2021

माझिया प्रियाला प्रीत कळेना*


 *माझिया प्रियाला प्रीत कळेना* 


श्रावणी पाऊस धारा बरसत आल्या

आसमंत गंधाळला लतावेली बहरल्या 

चराचर फुललेले कैसे तुज समजेना

माझिया प्रियाला प्रीत कळेना


सांज केशरी बघ तुझी वाटुली पाहते 

हुरहूरती कातरवेळ काय तुज सांगते

मनातली घालमेल कैसी तुज उमजेना

माझिया प्रियाला प्रीत कळेना


बघताच तुला मी आनंदुनी मोहरले

साज शृंगार हा तुझ्याचसाठी सजले

सजणे मोहरणे कैसे तुज कळेना

माझिया प्रियाला प्रीत कळेना


ही प्रीत माझी साजणा जन्मांतरीची

तुझे चित्र रेखाटले आस रे सोबतीची

कळाव्या तुला मनातील माझ्या भावना

माझिया प्रियाला प्रीत कळेना


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment