Saturday, 30 January 2021


गागालगा लगागा गागालगा लगागा

गंधाळल्या फुलांना केशर सुवास आहे
सांजावल्या क्षणांची ही वेळ खास आहे

नारीच काळ झाली नारीस जन्म देण्या
प्रेमात भावनेचा का होत ऱ्हास आहे

घोंगावते अजूनी वादळ मनातले का
वाऱ्यास ही कळेना साराच भास आहे

रानीवनी धुकेही दाटून शुभ्र आले
ओलावल्या दवांचा गवतास ध्यास आहे

तोडून प्रीत माझी गेलास का निघोनी
येशील तू पुन्हा ही हृदयात आस आहे.

रसिका

No comments:

Post a Comment