*शुभ सकाळ* 🙏🏻🌹
गगनी भास्कर आला
करी ओमकार नाद
आरोग्याचे देई दान
ओमकाराचा निनाद
शांत रम्य सुप्रभाती
झाला गंधित प्रहर
योगशास्त्र उच्चतम
पहा सांगतो भास्कर
निरामय आरोग्याचे
करा नित्य संरक्षण
सारे नियम सांभाळी
श्वासावरी नियंत्रण
श्वास दिलेत मोजून
कैसे घ्यायचे आपण
मार्ग दावुनी आपणा
गुरू करितो रक्षण
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment