शुभ सकाळ* 🙏🏻🌹
रविराज ये क्षितिजी
उगवती तेजाळली
सद्गुरू कृपांकित
शुभ सकाळ जाहली
दत्त दत्त नामाचा या
दिनरात लागो ध्यास
स्मर्तृगामी गुरुराजा
तव चरणांची आस
अंधाराच्या गर्भातून
ये चैतन्याचा प्रकाश
उजेडात गवसेल
ज्याचे त्याचे आकाश
परस्पर नात्यांची ही
दीपमाळ उजळावी
पणतीच्या ज्योतीसम
मनांगणी तेजाळावी
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment