Sunday, 31 January 2021

प्रसंगानुरूप काव्य*

 *प्रसंगानुरूप काव्य* 


गाली फुलले चांदणे

उठे लकेर हास्याची

परी मनात सलते

सांग वेदना कशाची


भेट जन्मांतरीची ही

आज घडून आलेली

मनातील उध्वस्तता

कळू दे ना साठलेली


अशा वेदना रुजल्या

खोल मनाच्या तळाशी

चेहऱ्यातील हास्यात

दिसे थेंब नयनाशी


असे संचित प्रारब्ध

सोबतीने जे आलेले 

कर्मबंधनाचे खेळ

नियतीने खेळलेले


विसरावे झाले गेले

खेळ खेळू पुन्हा नवा 

हे चांदणे तेजाळले

नभी नवीन चांदवा


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment