सुख म्हणजे काय
असतो अनुभव
प्रत्येकाचा वेगळा परी
असतो फक्त स्वानुभव
आठवणींचं मोहजाळ
जातं सुखावून कधी
सोबतीचा हा भास
देतं असे कधी मधी
सुखाचे हे वारे असे
भिरभिरती जीवनी
पाखरांची भरारी
आनंदाश्रू दे नयनी
हात आधाराचा जेव्हा
वटवृक्षास लाभतो
परिभाषा सुखाची
हेच प्रमाण मानतो
सुख दुःखाचा फेरा
पाठशिवणीचा खेळ
क्षण सुखाचे मानावे
ऐसा रंगवावा खेळ
घडेल ते घडू दे
मिळेल ते मिळू दे
संचित प्राक्तनाचे भोग
सारे ऐसे भोगू दे
सुखाची परिभाषा ऐसी
शिकविती गुरुराज
सुख म्हणजे नक्की हेच
तुम्हा सांगते रसराज
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment