*शुभ सकाळ* 🙏🏻🌹
गवाक्षातून नभाच्या
क्षितिजासी सूर्यबिंब
खळाळत्या सागरात
दिसे त्याचे प्रतिबिंब
बिंबाचेच प्रतिबिंब
प्रतिबिंब सगुणाचे
निराकार तो निर्गुण
हृदयात बिंब त्याचे
वसे हृदयी सतत
नामस्मरण करता
भवताली व्यापलेला
येई स्मरण करता
नाम जपता जपता
भेट सगुणाची होई
रूप कोणते तयाचे
तूच पडताळा घेई
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment