Sunday, 31 January 2021

प्रसंगानुरूप काव्य* ®️

 *प्रसंगानुरूप काव्य* ®️

लागा चुनरी पे दाग.....


उमटला होता गर्भातून

सोहं सोहं चा नाद.

भवसागरी ऐकू आली

कोहं कोहं ची साद.

कुठल्या ओढीने आले

या मायेच्या संसारी?

विसरले मी कोण?

अशाश्वत ,भौतिक सुखाच्या

मागे धावतांना.

कर्म संचित प्रारब्ध

होतंच सोबतीला.

कळलंच नाही 

इतकी रमले या मायेत.

अंतरातल्या जाणिवेला

नव्हती जाणीव

साधन लाभले पण

काही साध्य करता 

आले का? 

परमपित्यालाच विसरले

पापाचे गाठोडे वाढले

देहाचे भोग भोगतांना

अंतरात्मा  कुठे आहे?

तो का दिसला नाही

हे जगत्पिता 

मार्ग दाखव 

तुझ्याशिवाय कोण

आहे 

या भवसागरी..... 


©️रसिका राजीव हिंगे

       8600047066

No comments:

Post a Comment