Sunday, 31 January 2021

शुभ सकाळ

 *शुभ सकाळ* 


अरुणोदय झाला झाला

मित्र उदयाचली आला

भास्कर दिनकर का रविकर

सगुणरूप घेउनी आला


कधी दिसतो ज्ञानसूर्य

धर्मसूर्य धर्म परायण

ओमकाराचा नाद येता

मनामनात हो उच्चारण 


तेजोमय हा ग्रहगोल

स्वयंप्रकाशित नारायण

शिंपडन करी सर्वस्वाचे 

करितो सारेच समर्पण


समर्पणाचे हे औदार्य

देवा मज ठायी यावे 

गुरू पदी लीन व्हावया

मी पण माझे सरावे


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment