Sunday, 31 January 2021

शुभ सकाळ* 🌹

 🌹*शुभ सकाळ* 🌹


तेजपुंज रविकर

नभी तांबडं फुटलं

प्रतिबिंब धरेवरी

किती सुरेख पडलं


आभा केशरी पसरे

झाड पाना फुलावरी

सौंदर्याची उधळण

झाली ऐसी सृष्टीवरी


भक्तिभाव जागृतीचा

जणू असे पर्वकाळ

नामयज्ञ जपध्यान

करण्यास शुभवेळ


शुभंकर या वेळेस 

आठवती गुरुराज

भक्तासाठी घेई घाव

स्मर्तृगामी दत्तराज


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment