Sunday, 3 January 2021

संकल्प नवं वर्षाचा

 


नवं वर्षाचे स्वागत

संकल्पाचे उच्चारण

शब्द मज भेटताच

निराशेचे उच्चाटन


शब्द यावेत जुळुनी

यावी धार लेखणीस

सरस्वती ध्यावी गावी

मूर्तरुप संकल्पास


शब्दांच्या गावा फिरुनी

शोधावे शब्दभांडार

आंजारुन गोंजारून

भरावे शब्द आगार


नक्षत्र वेलीवरची

शब्दफुलें अभ्यासावी

साहित्याची मांदियाळी

लेखनाचा मार्ग दावी


प्रतिभा नि प्रतिमेच्या

साहित्य संगमावरी

शब्दांकुर फुलुनीया

काव्य व्हावे भरजरी


अभिरुची कलासक्त

शब्दामाळ माळतांना

सालंकृत असा साज

लाभावा मम शब्दांना 


ऐसा संकल्प करुनि

काही लिहावे वाटले

नक्षत्रासम चंदेरी

भेटले हो शब्दफुलें


रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment