*मन मनास उमजत नाही*
नभी नक्षत्रांचे तारांगण
मनी आठवांचे नभांगण
मन कसे समजत नाही
मन मनास उमजत नाही
मन द्वंद्वाचे समरांगण
भावनांचे हे आशयघन
विचार यास उमगत नाही
मन मनास उमजत नाही
मन जाई सागरतळाशी
मोत्यांच्या कोंदणी ऐसे
शांत पणे पहुडले राही
मन मनास उमजत नाही
अंधारातील प्रतिछायांचे
प्रतिबिंब दिसे हृदयात
मना सावर आवर काही
कैसे तुज उमजत नाही
काहूरलेल्या सांजवेळी
दूर कुठेतरी क्षितिजावरी
मन उगाच धावत राही
मन मनास उमजत नाही
सुख दुःखाचे क्षण सारे
आनंदे साजरे करतांना
मनोमनी उमलत राही
ऐसे कैसे उमजत नाही
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment