*शुभ सकाळ* 🌹🙏🏻
आले आले रविराज
शुभ दिस घेऊनिया
भासे प्रकाश मंगल
दिसे शुभ केशरिया
भाग्य घेऊनी ये दिस
गुरुपुष्य योगावरी
दुग्धशर्करा हा योग
पौर्णिमा ही शाकंभरी
ऐसी शुभंकर वेला
ध्यावे आराध्यासी आता
गुरु कृपेचा प्रसाद
लाभे नामासी जपता
साधावे हो अनुष्ठान
जपध्यान गुरुमंत्र
भवपार करण्यास
लाभे साधन नि तंत्र
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment