Sunday, 31 January 2021

चित्रकाव्य

 













पश्चिमेच्या घाटावरी

सांज खुले केशराची

निष्पर्ण या तरुवरी

चंद्रकोर चवथीची


सोनसळी या रंगात

प्रकाशले तरुवर

काळसर वृक्षछाया

दाटे सावळ्या भुवर


सौंदर्याचे शिपडणं

करी चवथीची कोर

परिसर गंधाळला

दरवळे मनमोर


अंधःकार दाट दाट

भिववितो हृदयास

प्रकाशाचा कवडसा

दावी चांदवा मनास


निष्पर्ण या जीवनात

देई  साथ शीतलता

शांत चांद्र प्रकाशात

निरामयसी शांतता


©️रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment