आज उशीर झाला आहे
रविराजा तुला येण्यास
ढगाआड लपला की
आज उशीर केलास
जर आला नाहीस
तर स्तब्ध होते सृष्टी
थांबेल न चराचर
होऊ दे चैतन्य वृष्टी
सारे तुला ठावे आहे
घेतो उगाच परीक्षा
आता यावे झडकरी
करु नकोस रे शिक्षा
ऱ्हास पर्यावरणाचा
होतो आहे रोज जरी
जागा झालाय मानव
आणू आनंद भूवरी
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment