*पन्नाशी*
*जरा विसावू या वळणावर* ®️
आयुष्य आहे किती सुंदर
जगणे प्रत्येकाचे वेगळे
हेवा वाटावा जगतांना
कितीक झाले रम्य सोहळे
दिसती येथे सुंदर तरुवर
जरा विसावू या वळणावर
अर्धशतकी आयुष्याचे
सोने झाले वाटे मला
पाखरे घेती उंच भरारी
धन्यता वाटे या जीवाला
जीवन वेल फुलली भरभर
जरा विसावू या वळणावर
कर्तव्य आणि गरजेची
सांगड घालून प्रत्येकाने
पाने लिहिली जीवनाची
समजून घेत आनंदाने
शांत रहावे का पळभर?
जरा विसावू या वळणावर
नकोच आता हेवे दावे
स्वच्छंदी जीवन जगावे
बालपणीचा काळ सुखाचा
हेच पुन्हा अनुभवावे
सोडुनी चिंता सारी क्षणभर
जरा विसावू या वळणावर
अतिसुंदर या वळणावर
जणू व्हावे एक रानफुल
विसरुनीया बंधन सारे
आनंदाची पुन्हा चाहूल
या आनंदाचा ठेवा मनभर
जरा विसावू या या वळणावर
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment