*आज जागतिक हस्ताक्षर दिन*
पाटीवरी गिरविला
लेखणीने श्रीगणेशा
माय बाप गुरुजन
सांगे ध्यावे शब्द ईशा
गिरवुनी अक्षरांना
शब्द सामर्थ्य वाढले
हस्ताक्षर देते आम्हा
जणू मनीचे दाखले
रोज लिहा काहीतरी
ऐसा समर्थांचा बोध
अक्षरांशी मैत्री व्हावी
मिळे तैसाच प्रबोध
©️रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment