*शुभ सकाळ* 🌹🙏🏻
आज पुन्हा हरवली
दाट धुक्यात पहाट
रविराजा ये सत्वरी
सृष्टी पाहते रे वाट
चमचम दवबिंदू
शोभे धरेच्या महाली
गवताची पाती पुन्हा
गारव्यात शहारली
घरीदारी भूपाळीचे
स्वर आले सुरेलसे
पाखरांचा कलरव
भासे स्वर कोमलसे
सडे घातले अंगणी
रेखाटन रांगोळीचे
ऐसे करिती ललना
जणू भाव अंतरीचे
©️रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment