*शुभ सकाळ* 🌹🙏🏻
पूर्व क्षितिज सजले
सोनसळी किरणांनी
निळ्याशार आभाळात
आली पहाट नटुनी
अरुणाचा रथ येई
उजळला पूर्व घाट
रांगोळ्यांच्या पायघड्या
सुशोभित झाली वाट
रांगोळीच्या रंगासम
व्हावे जीवन रंगीत
रेघ प्रत्येक सांगते
नात्यातील गुपित
थेंब थेंब जोडुनिया
रंगावली सजते ही
ऐसी जोडावीत मने
मनातील नाते ही
©️रसिका राजीव हिंगे
8600047066
No comments:
Post a Comment