शिशिर जातो वाट चालत
पाचोळ्याचे पैंजण नादवीत
गर्द रंगाचे सौंदर्य लेऊन
ग्रीष्मात येतो तू मोहवीत
तुझं फुलणं, तुझं बहरणं
पानाफुलातून दरवळणं
आरोग्याचे शिंपण करीत
मनाला भुलवित तुझं येणं
तुझ्या अस्तित्वाने फुलते
पायवाट ती रानीवनी
सुर्यसखा आहेस का तू
दावानल भासे दुरुनी
रसिका राजीव हिंगे

छान
ReplyDeleteदिवस पळस फुलायचे
भगव्या रंगात रंगायचे
मस्त,👌👍
ReplyDelete