सहज सुचलं म्हणून...
"संगत गुण की सोबत गुण" ही म्हण लहानपणी ऐकून ऐकून डोक्यात फिट झाली अगदी. तेव्हा अर्थ कळत नव्हता म्हणण्यापेक्षा कळून घ्यायचाच नव्हता असे म्हंटले तर वावगे ठरू नये. कारण रोजच आईचा पाढा असायचा बाहेर गेली की कुठे गेली, का गेली आणि कोण होतं बरोबर हे जास्त महत्त्वाचे. इतक्या बारकाईने तिने माझ्या संगतीवर, माझ्या मित्र मैत्रिणींवर नजर ठेवली म्हणून मला आज हे चांगलं आयुष्य जगता येतं आहे. असो.
आपल्या आयुष्यात कितीतरी सोबत असतात त्यांच्या चांगल्या वाईट कृतीतून,बोलण्यातून आणि देहबोलीतून सुद्धा जीवन घडत जातं नकळतपणे.
"ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला , वाण नाही पण गुण लागला" ही शेतकऱ्याजवळ असलेली बैलजोडी. ढवळ्या शुभ्र पांढरा आणि पवळ्या पिवळसर. शेतकऱ्याला शुभ्रतेचे आकर्षण असल्यामुळे ढवळ्या जवळ जर पवळ्या बांधला तर तो पण पांढरा होईल या आशेने तो पवळ्या बांधतो. पवळ्या शांत,कामसू तर ढवळ्या द्वाड, मारकुटा म्हणून प्रसिद्ध. याचा परिणाम असा झाला की पवळ्या तर शुभ्र पांढरा झालाच नाही पण ढवळ्याचे दुर्गुण त्याने आत्मसात केले. वाईट संगतीचा परिणाम.
No comments:
Post a Comment