कृष्ण कृष्ण धावा करीता
कृष्णसखा आला धावत
वसने पुरवी पांचालीस
चिंधीचे ऋण ते राखत
सूक्ष्म कर्मबंधनाचे त्या
फळ दिधलेस द्रौपदीला
सत्कर्माच्या मार्गावरी
सांभाळतसे भक्ताला
स्मरण करताच येईन
मीच आहे कणाकणात
ग्वाही देई अस्तित्वाची
सदभक्ताला क्षणाक्षणात
शुभ सकाळ
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment