Saturday, 13 March 2021

शिवशाहीचा सूर्य तळपता

 







प्रथम वंदन गणेशाला

नमन अंबा म्हाळसाई ला

दे आशिष रसराजला

पोवाडा रचण्याला जी जी जी जी 


लाल महाली निवांत होता

औरंग्याचा मामा शाहीस्ता

गनिम गाफिल होता

शिवशाहीचा सूर्य तळपता

आला शिवबा  जी जी जी जी


हर हर महादेवचा गजर

भ्याड शाहीस्ता झाला फरार

बोटं कापली शिवबाने चार

गनीम घाबरला फार

आला शिवबा जी जी जी जी


आई भवानीची तलवार

घेऊनी केलेत बहु वार

शत्रू झाला बेजार

घेऊनी शिवाचा अवतार

आला शिवबा जी जी जी जी


जीवा म्हालास मागे ठेवुनी

आला आग्य्राहूनी सुटूनी

हातावरी तुरी देऊनी

आला स्वराज्यात राजा मानी

आला शिवबा जी जी जी जी


लेकी बाळीस अभय दिले

गडकोट किती ते जिंकले

स्वराज्याचे तोरण बांधले

शिवराय छत्रपती झाले

शिवराय छत्रपती झाले जी जी जी जी


रसिका राजीव हिंगे



4 comments: