Thursday, 11 March 2021

चित्रकाव्य

 



निसर्गाची चाहूल ग

सोनसळी पावलात

हिरवाईची स्पंदने

पदरव हृदयात


हळदुले ठसे जणू

काळजात उमटले

तनामनावर ऐसे

रूप सृष्टीचे फुलले


नखे निसर्गदेवीची

परमेश रंगवितो

लाल रंगी आवरण

पद शोभित करतो


पदन्यास नुपुरांचा

अनाहत नाद येई

प्रक्षाळण पदांचे या

सागरात नित होई


रसिका राजीव हिंगे


No comments:

Post a Comment