Thursday, 18 March 2021

चिंब सरीत भिजतांना

 



आले दाटून कृष्ण मेघ

मनाकाशी सौदामिनी

गर्जली प्रकाश रेघ

कैसे मळभ मनांगणी


पापणकाठ ओलावला

आल्या बरसत धारा

स्तब्ध वीज शलाका ग

पाहुनिया वेग सारा


वाहती गे ओहळ ऐसे

नद्या नाले ओसंडले

कालिंदीला जणू पूर

भान नच ग उरले


कैसी ही सावळ प्रीत

शब्द नुरे आठवांना

मन झाले गोकुळ गे

चिंब सरीत भिजतांना



रसिका राजीव हिंगे


 

No comments:

Post a Comment