शुभ सकाळ
झाली सकाळ आला रविकर
सहस्त्र किरणे सद्गुरू द्वारी
गुरू कृपांकित होई ऐसा
दर्शन घेई तिथे क्षणभरी
दिनकरा किती तू भाग्यवंत
सद्गुरूनाथ भेटे तुजसी
सगुण साकार रूप तयांचे
डोळा भरुनी तूच पाहसी
देई दर्शन झडकरी जना
तिष्ठविसी किती दत्तात्रया
साद घाल रे बाळा ऐसी
आवर सावर आता माया
स्मर्तृगामी आहेस ना तू
भक्तांसाठी धावत येसी
सारे सारे मंगल कर तू
हेच मागणे या चरणांसी
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment