Saturday, 13 March 2021

 बा गजानना

थकलास का देवा?

काल खूपच भक्त आले होते.

मनात काही ना काही हेतू घेऊन

स्वतःस पुन्हा कोंडून घेतलेस! 

अपराधाची शिक्षा तर आम्हास

व्हायलाच हवी... तरी पण गुरुराया

मंदिरात तुझी मूर्ती पाहली न की

तू भेटल्यासारखं वाटतं... 

चराचरात, कणाकणात

तूच आहेस तरी पण... असं वाटतं..

सगळ्यांनी तुला एक प्रार्थना 

केली असेलच.....

हे जैविक युद्ध थांबव...

पुरे झाली न रे आता शिक्षा

घाल त्याच्या पाठी तुझी काठी

जशी विठोबा माळ्याला मारलीस....

भक्तवत्सल ऐसे ब्रीद आहे  तुझे... 

लेकुराचे अवघे हित.. माता तेच जाणत...



रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment