माघ वद्य सप्तमीस
प्रगटले शेगावासी।
*अनंतकोटी* करांनी
रक्षण्यास भक्तांसी।
गुणगारा गजानना
साष्टांग नमन तुज।
*ब्राह्मन्ड नायका* ईशा
त्रिवार वंदन तुज।
अनंत लीला तुझी
भक्तांसी त्वा तोषविसी।
*महाराजाधिराजा* तू
तुझे गुण गाऊ किती।
बंकट भक्तीचा कस
लावूनिया उद्धरिले।
*योगीराज* गुरूनाथा
मक्षिकेस ही तारिले।
श्रद्धा,भाव अन भक्ती
तेथेच तू आहेस बा।
*परब्रह्म* दिनानाथा
कवर निष्ठा पाही बा
निर्जल वापीस जल
येई रे तव कृपेने।
*सच्चीदानंदा* कृपाळा
केवळ नामस्मरणाने।
वठल्या आंब्यासी पाने
पितांबरा हस्ते आणिली।
*भक्तप्रतिपालका* देवा
भक्तीस त्याच्या रक्षिले।
साधुत्वाची देई प्रचिती
भ्रमण करोनि देशी
*शेगावनिवासी* राणा
हृदय सिंहासनी बसशी
तव दर्शनाची आस
मम चित्ता लागली रे।
*समर्थ सद्गुरू* नाथा
ये धावुनी सत्वर रे।
मी गेलो ऐसें मानू नका
ग्वाही दिली भक्तांना।
*श्री गजानन महाराजा*
दर्शन देशी भाविकांना।
जयजयकार घुमतो
आसमंत ही गर्जतो।
*जय* जय गजानना
चराचर हा नांदतो।
रसिका राजीव हिंगे
🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment