जिथे आभाळ धरेला
जाऊनिया भेटते गे
तिथूनच ऐसी बयो
झुळझुळ वाहते गे
सुजलाम सुफलाम
करी सारा परिसर
शालू हिरवाई घेसी
लपेटून अंगभर
संथ वाहे जलधारा
नसे खळाळ किनारी
अविरत वाहतसे
ऐसी माये तू संसारी
काय काय दडलेले
खोल खोल अंतरात
सागराच्या मिलनाची
ओढ तुझिया मनात
रसिका राजीव हिंगे
8600047066

No comments:
Post a Comment