शुभ सकाळ
तूच माय बाप
तूच भक्त त्राता
तू भाग्यविधाता गुरुराजा।
श्रद्धेवीण भक्ती
भक्तीविण मुक्ती
साधावया शक्ती तूच देई।
अहंकारी मन
सरे मी तू पण
धरिता चरण तुझिये रे।
जन्मांतरीचे हे
प्रारब्ध संचित
तव कृपाहस्त लाभतसे।
सोडोनिया चिंता
सारे भक्तजन
तुजला शरण दत्तात्रया।
नामस्मरणाचा
लागो सर्वा नाद
घाली तुला साद भक्त सारे।
तारी तारी आता
सद्गुरुनाथा
चरणी या माथा ठेवीतसे।
हे करुणाकरा
संकटास वारी
माया ही सावरी
रामराया।
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment