जगण्याचा हिशोब मांडतांना
आयुष्याच्या सारीपाटावर
दान मनासारखे लाभले
परी कैसे काही कळेना
काय संपले काय उरले
मी माझे करता करता
अर्ध शतकी चाल झाली
वजाबाकीस नसे थारा
बेरीज कर्माची होत गेली
जगण्याचा हिशोब मांडतांना
नात्यांचा झालाय गुणाकार
सूत्रांचा नुसता भडीमार परी
आठवणींचा नसे भागाकार
अहंकार वाढत असताना
अजूनी मी पण नाही सरले
जगण्याचा हिशोब मांडतांना
प्रेम मात्र शिलकी पडले
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment