चित्रकाव्य
विश्वासाने हात देता मिटतील ही अंतरे
नात्यामध्ये विश्वासाला सार्थ करावे विचारे
कैसा विचार मनात थांबलेत का हे हात
विसरुनी हेवेदावे जागा द्यावी अंतरात
विचारांती कळे सारे हात देता मदतीचा
सार्थ होईल जगणे कळे अर्थ जीवनाचा
हात धरुनी बाळाचा माय शिकवी चालणे
सुरक्षित भासे इथे वत्सलतेच्या मार्गाने
बोट आपुले धरुनी गुरुराज मार्गावरी
मिटवीत भय सारे ऐसा चाले बरोबरी
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment