नातं
सोनसळी पावलांनी
हिरवे स्वप्न पेरत
आलीस तू घरी.....
नाते घट्ट जोडायला...
अलवार क्षणांचं नातं असंच..
दृढ होत असेल असे वाटतं...
नाही का?
दोन जीवांचं नातं सगळं...
घर जोडत जातं....
आणि बहरते वेल!
अशीच माणुसकीच्या
नात्यांची पण....
अन रुजतात मुळं..
नात्यांची खोलवर!!!
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment