शेगावीचा राणा
शेगावीचा राणा भक्त तारावया
समर्था योगिया गजानन।
माघ सप्तमीस प्रगटले नाथ
सद्गुरुनाथ गजानन
अन्न परब्रह्म कण ते वेचती
कळावी महती सकलांसी।
बंकटास दृष्टी ओळखाया तुज
भक्तीची समज ऐसी दिली।
जीवन वृक्षास आण भक्तीपाला
जैसा हो आणिला पितांबरे।
बापुना काळ्यास विठ्ठल दर्शन
तैसेच चरण दावी मज।
किती किती सांगू भक्तीच्या या कथा
सांग गुरुनाथा गुणगारा।
ब्रह्मान्ड नायका तूच तारी आता
माझ्या या भारता संकटी रे।
आहे तू इथेच देसी अनुभुती
येते रे प्रचिती तुझी देवा।
दत्तगुरुकृपे प्रार्थिले तुजसी
नामस्मरणासी जागवी रे
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment