Saturday, 27 March 2021

चित्रकाव्य




मज भेटतो सावळ सखा

निलांबरीच्या रंगात या

दशदिशातुनी नीलवर्णी 

कशी घडली ऐसी किमया


निळ्या नभाची पडछाया

डोंगर दऱ्यातुनी फिरते

निळी झुळूक थंडी लेउन

निळसर पाण्यातुन वाहते


हिरवे स्वप्न पेरत आली

वसुंधरा गे ठायी ठायी

रुणझुणतो शीतल वारा

जणू पैंजण राधे पायी


घेई कवेत निळा प्रवाह

काळ्या सागराची लाट

सरीत्सागराच्या मिलनास

नभ आले उतरून दाट


रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment