रोज नवे चित्र दिसे
नवी रंग उधळण
पूर्व क्षितिजावरती
रोज नवे नभांगण
भासे नवे क्षणोक्षणी
निसर्गाचे बदलणे
गर्भातून पृथ्वीच्या गे
रोज नवे अंकुरणे
पाखरांचा कलरव
नित्य भासतो नूतन
हळदुल्या किरणांस
रंग येतसे नवीन
प्रत्येकाचे जगणे हे
क्षणभंगुर आहे रे
नित्य सत्कर्म करता
सोपे जीवन होई रे
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment