संत नामदेव यांचा हा अभंग म्हणजे माय लेकरांचे जसे नाते असते तसेच परमेश्वर म्हणजे पांडुरंगाला माय म्हटले आहे. आई जशी बाळासाठी काहीही करते तसेच पांडुरंग त्याच्या भक्तांसाठी आहे. बाळ जर कुठल्या संकटात असेल तर माता जशी त्याच्यासाठी जीवाचे रान करते आणि त्याला वाचविते. थोडक्यात बाळ हे आईच्या ताब्यात आहे, स्वाधीन आहे म्हणजे सुरक्षित आहेत तसेच मी तुझ्या ताब्यात आहे. तुझा दास आहे. पक्षिणी,हरिणी, चातक यासारखे उदाहरणे देऊन त्यांनी त्याच्या अभंगाची गोडी वाढविली आहे. पांडुरंगमय झालेले नामदेव यापरिस काय लिहू शकणार.
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment