जनाबाई या अतिशय संवेदनशील होत्या. नामदेवांच्या घरी लहानाच्या मोठ्या झालेल्या जनाबाई नामदेवांच्या शिष्या झाल्या.
विठ्ठल नामाचा ध्यास घेतलेल्या जनीला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त विठ्ठल दिसत असे.
अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या जनी कडे विठ्ठल खायला मागायला येतो म्हणजे जनीची परीक्षा घ्यायला आलेला आहे का?असे वाटते. पण आलेल्या अतिथी ला विन्मुख कसे धाडायचे म्हणून घरातले पंचामृत आणि भात वाढला. विठ्ठल प्रसन्न झाला. चार ओळींच्या अभंगात निरक्षर जनाबाई किती मोठे तत्वज्ञान सांगून जातात.
रसिका राजीव हिंगे


No comments:
Post a Comment