वैभव जोशी यांच्या कबीर या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न .....
मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला
जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला
कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे
मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा न धीर झाला.
असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जातो
सहज तुझे नाव घेतले, श्वास श्वास हा बेफिकिर झाला
पदोपदी भास होत आहे, जणू तुझा स्पर्श होत आहे
सदेह भेटायला तुला भक्त हा खरोखर अधीर झाला आहे.
मला न पर्याय राहिला, लेखणीस केले तुझ्या हवाली
तुला न पर्याय राहिला, शब्द शब्द माझा कबीर झाला”
वैभव जोशी
रसग्रहण
वैभव जोशी त्यांच्या कबीर या गाझलेतून स्वतः च कबुली देऊन मोकळे झालेत. मी माझ्या आयुष्यात मनाच्या मोहपाशात इतका गुरफटलो की माझ्या मनात तू आहेस अन् त्याचा नाद होतोय, हे मी ऐकलेच नाही. तो नाद मी जागवला पण खूप उशीर झाला. मला ओमकराचा अनाहत नाद जेव्हा ऐकायला येऊ लागला तेव्हा माझे रोमरोम, माझे चित्त तुझ्या कडेच वळले.
असा कोणता मोह आहे या जगात सुटणार नाही. इथे त्यांना गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश आठवला की काय असे वाटते. कारण अभ्यासाने सगळं प्राप्त होऊ शकतं, असं कोणतीच गोष्ट नाही की अशक्य प्राय आहे. माझाच अभ्यास कमी पडला असावा म्हणून तर या मोहाची गाठ सोडण्याचा धीर मी करू शकलो नाही.
काहीही न करता कधी मुक्ती सुखासुखी मिळते का असा प्रश्न विचारून कवी ईश्वराला च प्रश्न विचारतो आहे की मी कसा इतका मायेच्या आवरणाखाली होतो की मला कळलच नाही तुला कसे भेटायचे.
पण आता माझे मायेचे आवरण पार गळून पडले आहे आणि तुझ्या भेटीची उत्कटता वाढते आहे.
गझलकार इथे पूर्णत: शरणागती पत्करतो आणि मी तुझाच झालेलो आहे, आता तुझ्या आणि माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही, तुझ्या चरणी मी लिन होऊन आलेलो आहे आता आश्रय दे....
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment