विं. दा. करंदीकर यांची पाऊस आला पाऊस आला ही बाल कविता. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची कशी त्रेधतिरपीट उडते याचे वर्णन कवींनी यात केले आहे.
कडाड कडकड विजा, भणाण वारा ह्या उपमा देऊन याचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न.
हा अचानक आलेला पाऊस बहुधा हेमंताच्या शेवटी किंवा शिशिर ऋतूत बरसला असावा. दिवाळीचा किल्ला वाहून गेला, आजोबांनी छत्री शिवायला घेणे, वाळवण ओले होणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असे दिसते हा अवेळी आलेला पाऊस आहे का? शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंद आजही जसाच्या तसाच आहे. बालपणाची आठवण करून देणारी, निसर्गाचे वेगळे रुप उलगडून दाखवणारी ही भाव कविता आहे.
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment