लहान असतांना कधीतरी गोष्ट ऐकली होती स्वामी विवेकानंद यांची.
स्वामीजी एकदा रस्त्याने जात असतांना त्यांच्या मागे माकडांची टोळी लागते. स्वामी घाबरतात., पुढे पुढे भराभर चालत जातात. मागे वळून माकडांकडे पाहणे आणि पुढे चालणे, स्वामी थांबले की माकडे थांबत, ते पळाले की माकडे पळत असं बराच वेळ सुरू होत. पण मध्येच स्वामीजींना वाटले असे भिऊन कुठपर्यंत चालायचे. त्यांनी वळून माकडांच्या दिशेने चालणे,पळणे सुरू केले आणि काय आश्चर्य माकडं पळून गेली. तेव्हाच स्वामीजींनी ठरविले संकटांना घाबरायचे नाही, त्याच्या समोर जाऊन दोन हात केले की संकटे पळून जातात कारण संकटं भित्री असतात.
या गोष्टीमुळे मी इतकी प्रभावित झाले की आजही मला ही गोष्ट प्रेरणा देते आहे. मी माझ्या मुलांना विशेष माझ्या मुलीला कायम ही गोष्ट सांगत असते आणि मी तर स्वतः आचरणात आणते च आहे. आपल्यावर कशीही परिस्थिती आली तरी तिचा स्वीकार करायचा, पळून न जाता तिला सन्मुख व्हायचे हे मला स्वामी विवेकानंदांच्या या गोष्टीने शिकवले.
माझ्या जीवन वाटेवरचे हे गुरू मला असेच मार्गदर्शन करत राहो.
रसिका राजीव हिंगे.
आजचा विषय इतका सृजनात्मक आहे की बुद्धीला बरंच खाद्य मिळाले आहे. जसे मला स्वामी विवेकानंद वाचायला आवडतात तसेच सुभाषचंद्र बोस ही आवडतात, सावरकर तर म्हणजे माझ्या घरात,माझ्या विचारात आहेत.
त्यामुळे कोण जास्त आवडतं हा प्रश्न संपत नाही. हे ही छान, ते तर खूपच भारी. ग्रेसच्या कविता , रणजित देसाई, शिवाजी सावंत कोण कोण. असे कितीतरी आहेत मला माहीत असलेले आणि असेही खूपच आहेत जे मला माहीत नाहीत

No comments:
Post a Comment